खोजनवाडी
“प्रगतिशील, आत्मनिर्भर आणि विकासाभिमुख गाव”
ग्रामपंचायत सेवा
सरपंच रहिवाशी दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
जन्म प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- रुग्णालयाचे प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
मृत्यू प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड
- डॉक्टरी प्रमाणपत्र
- नातेवाईकाचा पुरावा
विकास कार्ये
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले प्रकल्प आणि भविष्यातील योजना
प्लास्टिक बंदी – प्लास्टिक मुक्त गाव
🌿 खोजनवाडी ग्रामपंचायतची अभिनव पाऊलवाट 🌿
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत प्लास्टिक बंदी – प्लास्टिक मुक्त गाव ही मोहीम खोजनवाडी ग्रामपंचायतीत उत्साहात राबविण्यात आली आहे.
या मोहिमेत ग्रामपंचायत, शाळकरी विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळ आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
✅ प्लास्टिक गोळा मोहीम
✅ कापडी पिशव्यांचे वितरण
✅ जनजागृती फेरी
✅ स्वच्छतेचा संदेश
आपलं गाव स्वच्छ आणि निसर्गपूरक ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
चला, आजपासून एकच निश्चय — प्लास्टिकला नाही म्हणूया! ✋🌍
खोजनवाडी – प्लास्टिक मुक्त गावाकडे वाटचाल! 🌱✨


खोजनवाडी ग्रामपंचायत | मुख्यमंत्री पंचायतराज अभियान
खोजनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात गावातील नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
डॉक्टर, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत टीमच्या सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
✅ सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✅ रक्तदाब / साखर तपासणी
✅ औषध वितरण
✅ आरोग्य जागृती
खोजनवाडी — आरोग्यदायी व सशक्त गावाकडे वाटचाल!
सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨
“गाव आपलं, जबाबदारीही आपली. स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि लोकसहभाग हाच खरी विकासाची चावी.”
चला, आपण सर्व मिळून हरित, स्वच्छ, प्रगत खोजनवाडी घडवूया.
पदाधिकारी/अधिकारी

मा. सौ. यशोदा बसवराज काराजनगी
लोकनियुक्त सरपंच ,खोजनवाडी

मा. श्री. ज्ञानेश्वर सिद्राया करोली
उपसरपंच, खोजनवाडी

मा. सौ. मनीषा अंबविणे
ग्रा. पं . अधिकारी
ग्रामपंचायतीशी संपर्क साधा
गावातील नवीन अपडेट्सबद्दल माहिती मिळवा, महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळवा किंवा सार्वजनिक सेवांमध्ये मदत मिळवा. बाज ग्रामपंचायत सर्व रहिवाशांना विश्वासार्ह माहिती आणि त्वरित सेवा देण्यासाठी येथे आहे.




